एक संध्याकाळ..

” अहो ऐकताय ना?..”
” नाही.. कानात तेल ओतलयं मी..”
” काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी..”
” अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?”
” ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?”
” काय आहे?…”
” अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे..”
” मग?..”
” मग काय?.. चला ना जाऊया आपण पण..”
” छ्छे… काय गं… कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा..”
” काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी..”
” बरं मग, तू जाऊन ये ”
” मी एकटी नाही जाणार..”
” मग सोड ना, काय बिघडणार आहे.. लग्नाला तर जाणारच आहे ना आपण..”
” पण?..”
” हे बघ राधा.. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतीस.. हवं तर चल मी तुला सोडून येतो.. पण चार चार तास एकाच जाग्यावर बसून, त्या म्हाताऱ्या बायांची गाणी ऐकण म्हणजे.. छे छे.. मला नाही जमणार..
बोल मग.. येऊ का सोडायला?..”
” नको रहुद्या.. लग्णालाच जावू ”
” आत्ता काय झालं?..”
” काय नाही.. ”
” अगं सांग ना काय झालं..”
” अहो खरंच काही नाही, सोडा तो विषय आता..”
” बरं बाई सोडला..”
” अहो, ऐकाना..”
” आता काय?..”
” चला ना बाहेर गार्डन मधे बसुया आपण..”
” राधा काय आहे गं?.. जरा शांत बसुदेना मला..”
” ओ, चला ना खूप मस्त वातावरण आहे बाहेर..”
” अगं काय बोलतीयेस.. बाहेर बघ तरी, किती ढग आलेत ते.. पाऊस पडेल एवढ्यात..”
” ओ चला, काही येत नाही पाऊस वगैरे.. थोडावेळ बसू आणि येऊ आत..”
” बरं चल.. (पाऊस आला अनी जर मी भिजलो.. मग सांगतो तुला)”

” ओ थांबा थांबा..”
” आता काय माझी आई?..”
” मी थोडी कॉफी घेऊन येऊ का?..”
” आता कशाला कॉफी.. चल..”
” थांबा.. मी आणतेच.. दोन मिनिटे तर लागतील..”

” घेतलं सगळं?.. का अजून काय राहिलंय बग…”
” काय ओ.. आपल्या दोघासाठीच तर घेतेय ना..”
” पण किती उशीर गं?..”
” झालं झालं.. चला..”

” किती गार वारा येतोय ना?..”
” ह्म्म..”
” संध्याकाळचं वातावरण किती मस्त वाटतं ना ओ?..”
” ह्म्म..”
” काय ह्म्म ह्म्म करताय?.. बोलाना काहीतरी..”
” तुझी बहीण कुठ असते गं सध्या?..”
” छे.. काय ओ, माझ्याबद्दल बोला म्हटलं तुम्हाला.. तुमचं नेहमी भलत्याच विषयाकडे लक्ष..”
” जरा कॉफी दे गं..”
” हे घ्या.. तुमचं तर माझ्याकडे कधी लक्षच नसतं.. नेहमी आपल तेच, काम काम आणि काम.. विसरलात का?.. लग्नाआधी कसं काम धंदा सोडून माझ्या मागे फिरायचा ते.. माझ्या भावाकडून दोनदा मार सुद्धा खाल्लात.. पण म्हणतात ना, माणसाला एकदा हवी ती वस्तू मिळाली की त्याची किंमतच उरत नाही.. ”
” चला आत, पाऊस आला बघा..”
” थांब राधा..”
” काय आहे, हात सोडा माझा आणि चला आत..”
” हा हात सोडण्यासाठी नाही धरला राधे..”
” आता काय शक्ती कपूर आला काय अंगात तुमच्या?.. चला ”
” अरे देवा… ही बाई मला रोमँटिक होऊच देत नाही..”
” म्हणजे.. काय बोलताय काय तुम्ही?.. तब्बेत ठीक आहे ना..”
” तू बस आधी.. खाली बस..”
” पण पाऊस?..”
” श्शशशश..”
” अहो आपण भिजतोय..”
” माझ्या डोळ्यात बघ राधे, माझ्या डोळ्यात बघ..”

” शिवता कर मी राधेचे.. तरंग उठले लाजेचे
नयन तिझे स्थिर होऊनी.. मोजे कंपन ओठांचे
स्पर्श होता सरसर कापे.. भिती उराशी लाखाची
थेंब दिसे मज दवबिंदू जब.. हसती राधा गालाशी ”

.
.
.
.
.

” अहो थांबा..”
” काय गं?..”
” पाऊस थांबला….”
” पण मी नाही… आज तरी नाही..”

…………………………………………………………….

– दिपक लोखंडे.

Advertisements

नामकरण.. एक प्रेमकथा…

गुरुवार १२ डिसेंबर, सकाळी ९:३० वा..

……………………………………………..
अहो ऐकलत का?..

तुम्ही लवकर अटपुन घ्या, आपल्याला डॉक्टरकडे जायचे आहे…
कशाला गं? तब्बेत बरी आहे ना?..
अरे देवा!… या माणसाच्या लक्षात एक गोष्ट राहात नाही..

विसरला का तुम्ही?

आज डॉक्टरनी बोलावलय चेकअप साठी..
अरे हो आलं लक्षात.. चल तु तयार हो लवकर मी गाडी बाहेर काढतो..

………………………………………………….
– २० मिनिटानंतर… 
(गाडीमध्ये सागर व त्याची बायको..)
सागर.. तुम्हाला काही विचारु का?
काय गं, यात परवानगी कसली घ्यायची.. विचार की…
तुम्ही लग्नानंतर माझं नाव का ओ  चेंज केलत?

 

का म्हणजे? तुला नाही का अवडत?.
अहो तसं नई.. रागाला कशाला येताय?

 मज्जा म्हणून विचारलं मी.

कविता नाव मस्तच आहे..

अनि तसं ही ‘शांती’ पेक्षातर खूपच बरं आहे..
हाहाहा.. तुझ्या वडलांच्या डोक्यात काय आलं असेल गं, तुझं नाव ठेवताना?.. ‘शांती’ हाहाहा…
अहो यात हसण्यासारखं काही नाही आ.. माझ्या आज्जीचं नावं पण शांतीच होतं.. 
अगं तेच तर, ‘शांती’ हे नाव ऐकलं की.. आपोआप डोळ्यासमोर एका अज्जीबाईंच चित्र निर्माण होत..

हे तर काहीच नाही..

सुरुवातीला तर, मला माझ्या मित्रांना सांगाव लागायचं. की ‘शांती’ माझ्या बायकोचं नावं आहे अज्जीच  नाही…
हां उडवा खिल्ली माझी.. तसं ही माझ्यावर कुठं प्रेम आहे तुमचं..
अगं असं काय बोलतेस, थोडी गम्मत केली तुझी..

चलं क्लिनिक आलं बघ..

हळु उतर आता.. आणि डॉक्टरला चांगल चेक करायला सांग. आपल्या बाळाला कसलाही त्रास होता कामा नये..

……………………………………………………………
– १  तासानंतर…

( स्थळ – नवजीवन हॉस्पिटल..)
सिस्टर, मि. सागर देशमुख यांना आत बोलवा..
ओके मॅम..
(- सिस्टर वेटिंग रुम मधे..)
मि. सागर देशमुख? 
हो..
तुम्हाला डॉक्टर सुमित्रा यांनी बोलवयं.. 

माझ्यासोबत चला..

…………………………………………….
बसा मि. सागर..
डॉक्टर, काळजी करण्यासारख काही नाही ना?
काळजी करु नका, बाळाची वाढ अगदी योग्यरित्या होत आहे…

आणि हो, मी काही औषधे लिहुन देते. ती यांना वेळेवर घ्यायला सांगा.. आणि आता जास्त काळजी घ्यायला हवी दिवस भरत आलेत, लवकरच गुड न्यूज मिळेल..
हो डॉक्टर..
दोन आठवड्यानंतर त्यांना घेवून या, चेकअप साठी..

…………………………………………………….
संध्याकाळी ६ वा..

(सागर व कविता गार्डनमधे…)
सूर्य मावळताना किती छान दृश्य निर्माण होत ना?
होय.. अहो तुम्हाला आठवतय? तुम्ही मला बघायला आला होतात, ती सायंकाळपण अशीच होती ना?
हो, आणि हे ही आठवतय की  त्या संध्याकाळी सासूबाईनी आम्हाला मिठाचा चहा पाजवला होता..
प्रत्येक गोष्ट गमतीत कशी ओ घेता तुम्ही!..
सॉरी सॉरी,  तुझं चालुदेत पुढे..
गप्प बसा..आता मला नाही त्यात इंट्रेस्ट..
बरं बाई, राहुदे…
अहो, ऐका ना.. तुम्हाला मुलगा हवाय की मुलगी?
माझं सोड, तुला काय हवयं?
मला तर एक सुंदर मुलगा हवाय तुमच्यासारखा. सतत माझ्या खोडी काढणारा, आणि तुम्हाला पण एक जोडीदार मिळेल ना माझा जीव खायायला..
हो ते तर आहेच… पण मला आधी मुलगीच हवी..
अहो असं काय बोलताय? तुम्हाला मुलं नाहीत का अवडतं?..
अगं तसं नाही.. बहुतेक तुला माझं बोलण काळाल नाही..
मग सांगा ना, काय भानगड आहे..
‘भानगड’…. अगं भानगडं वगैरे काही नाही.. मला फक्त माझं वचन पाळायचं आहे..
कसलं ओ वचन?.. आणि कोणाला वचन दिलत तुम्ही?..
स्वतःला..  
अहो तुमच हे बोलणं माझ्या डोक्यावरून चाललंय.. जरा नीट काय ते सांगा ना..
कविता, तुला आठवतंय? लग्नाआधी आपल्या घरच्यांनी आपल्याला बागेत पाठवलं होतं.. ओळख वाढवण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी..
अहो, मी कसं विसरु शकते तो क्षण.. आपली अशी एकांतात ती पहिलीच भेट होती..
तुला आठवतंय का गं? मी तुला त्या भेटीत काय म्हणालो होतो ते..
हो आठवतंय ना.. तुम्ही म्हटला होतात की – 

“शांती आता आपली दोन वेगवेगळी मनं एकत्र येणार आहेत.. मला वाटतं की आपण एकमेकांना आपल्या आयुष्यातील सगळ्या लहान मोठ्या गोष्टी 

सांगून या नात्याची सुरुवात करावी..”
अरे व्वा..!!

तुला अजून सगळं आठवण आहे?
हो, म्हणजे तुम्ही विसरलात ना?
नाही गं.. कसं विसरेन, अगदी निरागसपणे सगळं सांगून टाकलसं तु.. आणि तुझे ते बोल ऐकून, मला माझं आयुष्य पूर्णपणे सांगताच आलं नाही अगं..
मग त्यात काय एवढं? अत्ता सांगा ना..

……………..

एक मुलगी होती माझ्या आयुष्यात..

कॉलेजमधे ओळख झाली आमची, हळूहळू मैत्री वाढली.. आणि ती इतकी वाढली, की कॉलेजमधे  सगळे आमचं नाव जोडत होते.. मला हे सगळं फक्त एक गम्मत वाटत होती.. 

एक दिवशी ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली-

“सगळे आपलं नाव जोडू लागले आहेत, आता पुढे काय करायचं?”

अगं काय करायचं म्हणजे काय? आज बोलताहेत उद्या विसरून जातील…

“म्हणजे आपल्यात खरचं काही नाहीये का?”

त्यावेळी मी फक्त मान हलवून नाही म्हटलं…

ती निघून गेली..

अगदी कायमची…
मी रात्रभर तिचं बोलणं बरडत होतो, स्वतःला प्रश्न विचारत होतो.. आणि शेवटी उत्तर मिळालं..

बास्स यार, आपल्याला हीच आवडते..

मी ठरवलं आत्ता तिला भेटायचं, आणि  आपल्या मनातील तिच्यासाठी असणारी भावना तिला सांगायची…
मी तीची वाट पाहिली.. १ दिवस, १ महीना, वर्ष..

फोन ट्राय केला..

रोज वाटायचं ती आज येइल, आज येइल.. नाही आली तर फोनतरी करेलच..
पण म्हणतात ना.. कि गेलेली वेळ आणि हरलेलं प्रेम  कधी परत येत नाही..

……………………………………………………………
अहो, त्या मुळीच नावं काय होतं?
कोमल..
गेलेली वेळ जरी परत येत नसली, तरी  कोमल येइल परत… तुमच्यासाठी… ह्यावेळी तुमची मुलगी होवून..
म्हणजे?
आपणाला जर मुलगी झाली ना, तर आपण तीचं नाव कोमल ठेवु..

 

म्हणजे?…. मी इतकी मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवली, तरी तु माझ्यासाठी
तुमच्यासाठी? नाही ओ, हे सगळं मी माझ्यासाठीच तर करत आहे.. तुम्हाला काय वाटतं, मला याबद्दल काहीच भनक नव्हती?..

आपली पहीली भेट आठवते?.. तुम्ही मला काही सांगितलं नाही, 

कारण मी तुम्हाला काही सांगुच दिलं नाही… वेड्यासारखी बडबडत होते.. कारण मला माहीत होतं, की आज जर हा प्रेमाचा बांध तुटला आणि सगळ्या भावना माझ्या समोर मांडल्या, तर आपला बांध कधीच जुळू शकणार नाही…
(सागर गुडघ्यावर बसतो.. आणि कविताला घट्ट मिठी मारतो…)
मला माफ कर कवीता.. मला माफ कर…
उठा सागर… माझ्यासाठी नाही तर आपल्या बाळासाठी, कोमलसाठी उठा…
कविता मी तुझ्यावर खुप
अहो माहितीये ओ मला… आणि मीही तुमच्यावर खूप खूप प्रेम करते…
तु खुश आहेस ना गं?
(अरे वेड्या, याच क्षणासाठी तर मी जगत आहे….)
……………………………………………………………

(समाप्त…)

रंग नवा…

रंग नवा स्पर्शाचा, रंग तुझ्या सूगंधाचा..

स्वप्न नवे पाहन्याचा, रंग तुझ्या स्मित हास्याचा..

धूंद तुझ्या प्रेमाची, बरसते वर्षा होऊनी..

चिंब होते मन माझे, भिजूनी तुझ्या रंगात..

रंग नवा आनंदाचा, रंग तूझ्या सहवासाचा..

मोहून जाई मन माझे, पाहता तूला सामिप येता..

कळे ना काही, बावऱ्या मनाला..

देशिल का गं? प्रेम थोड, माझ्या या वेडया जिवाला…..